दहावीचा निकाल 2027 (10 वी चा निकाल): निकालाची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. तारीख: मे 2027 (अपेक्षित). निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in वेबसाईटवर आसन क्रमांक व आईचे नाव टाकून पाहता येईल. SMS: MHSSC आसन क्रमांक → 57766.
लिंक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उघडेल. लॉगिनसाठी: आसन क्रमांक (Seat No.) + आईचे पहिले नाव.
10 वी चा निकाल 2027 कधी लागणार आहे?
दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 या काळात होत आहे. मागच्या वर्षी (2026) परीक्षा 18 मार्चला संपली आणि निकाल 8 मे रोजी लागला. यंदा परीक्षा जवळपास आठवडाभर आधी संपत असल्याने दहावीचा निकाल मे 2027 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागेल, असा अंदाज आहे. बोर्ड तारीख जाहीर करताच इथे लगेच अपडेट होईल. सविस्तर: 10वी निकाल तारीख 2027.
दहावीचा निकाल कसा बघायचा?
- मोबाईलवर mahahsscboard.in उघडा.
- “इयत्ता 10वी (SSC) निकाल 2027” या लिंकवर क्लिक करा.
- हॉल तिकिटावरील आसन क्रमांक टाका.
- आईचे पहिले नाव इंग्रजीत टाका.
- “निकाल पहा” (View Result) वर क्लिक करा. गुण दिसतील – स्क्रीनशॉट घ्या.
दहावी निकाल 2027 – महत्त्वाची माहिती एका नजरेत
| मंडळ | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे |
| परीक्षा | दहावी (SSC) फेब्रुवारी–मार्च 2027 |
| निकाल तारीख | मे 2027 (अपेक्षित) |
| वेबसाईट | mahahsscboard.in |
| लागणारी माहिती | आसन क्रमांक + आईचे नाव |
| पास होण्यासाठी | प्रत्येक विषयात 35 टक्के |
| मागच्या वर्षीचा निकाल | 92.09 टक्के (8 मे 2026) |
दहावीत किती टक्के म्हणजे कोणती श्रेणी?
- 75 टक्के व पुढे – विशेष प्राविण्य (Distinction)
- 60 ते 74.99 टक्के – प्रथम श्रेणी
- 45 ते 59.99 टक्के – द्वितीय श्रेणी
- 35 ते 44.99 टक्के – उत्तीर्ण श्रेणी
मागच्या वर्षी दहावीचा निकाल कसा लागला?
2026 मध्ये 15,42,472 नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 14,20,486 उत्तीर्ण झाले (92.09%). मुलींचा निकाल 94.96% तर मुलांचा 89.56% – मुली 5.40% ने पुढे. कोकण विभाग 97.62% सह पहिला, तर छत्रपती संभाजीनगर 88.41% सह शेवटी होता. विभागवार पूर्ण तक्ता: SSC निकाल 2026.
तुमच्या जिल्ह्याचा दहावी निकाल
- पुणे 10वी निकाल 2027
- अहिल्यानगर (अहमदनगर) 10वी निकाल 2027
- सोलापूर 10वी निकाल 2027
- मुंबई 10वी निकाल 2027
- ठाणे 10वी निकाल 2027
- पालघर 10वी निकाल 2027
- रायगड 10वी निकाल 2027
- रत्नागिरी 10वी निकाल 2027
- सिंधुदुर्ग 10वी निकाल 2027
- कोल्हापूर 10वी निकाल 2027
- सांगली 10वी निकाल 2027
- सातारा 10वी निकाल 2027
- नाशिक 10वी निकाल 2027
- धुळे 10वी निकाल 2027
- जळगाव 10वी निकाल 2027
- नंदुरबार 10वी निकाल 2027
- छत्रपती संभाजीनगर 10वी निकाल 2027
- जालना 10वी निकाल 2027
- बीड 10वी निकाल 2027
- परभणी 10वी निकाल 2027
- हिंगोली 10वी निकाल 2027
- लातूर 10वी निकाल 2027
- धाराशिव (उस्मानाबाद) 10वी निकाल 2027
- नांदेड 10वी निकाल 2027
- अमरावती 10वी निकाल 2027
- अकोला 10वी निकाल 2027
- वाशिम 10वी निकाल 2027
- बुलढाणा 10वी निकाल 2027
- यवतमाळ 10वी निकाल 2027
- नागपूर 10वी निकाल 2027
- भंडारा 10वी निकाल 2027
- गोंदिया 10वी निकाल 2027
- चंद्रपूर 10वी निकाल 2027
- गडचिरोली 10वी निकाल 2027
- वर्धा 10वी निकाल 2027